का रे दुरावा, का रे अबोला
अपराध माझा, असा काय झाला
नीज येत नाहि, मला एकटिला
कुणि न विचारि, धरि हनुवटीला
मान वळविशी तु, वेगळ्या दिशेला ....
तुझ्या वाचुनि ही, रात जात नाही
जवळी जरा ये, हळु बोल काही
हात चांदण्यांचा, घेई उशाला ....
रात जागवावी नाही, असे आज वाटे
तृप्त झोप यावी, पहाटे पहाटे
नको जगणे हे, नको स्वप्नमाला .....
गीत : शब्दप्रभू ग.दि. माडगुळकर
संगीत : सुधीर फडके
गायिका : आशाताई (दूसरं कोण गाणार हे?)
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment