Monday, July 21, 2008

पाऊस कधीचा पडतो ...

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने.

डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती.

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला.

संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा.


गीत - ग्रेस
संगीत - यशवंत देव
स्वर - पद्मजा फेणाणी

No comments: